मुंबई : राज्यासह मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. (Heavy rains in Mumbai including the state) त्यामुळं पावसामुळं मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. (A large number of potholes on the roads) तसेच अनेक भागात घरांवर दरड कोसळल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. दरम्यान, पावसात अति धोकादायक इमारती (Extremely dangerous buildings) पडण्याची शक्यता सुद्धा असते, त्यामुळं अशा अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे पालिकेनं नागरिकांना आवाहन केलं आहे. (Municipality appeals to citizens to vacate extremely dangerous buildings immediately) अति धोकादायक इमारतींमध्ये (C1 Building) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश व त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिली.
[read_also content=”मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड, पण रस्ते व रुग्णालयांची कमतरता, राज्य सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा – उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/maharashtra/helipad-in-cm-village-but-lack-of-roads-and-hospitals-high-court-304242.html”]
दरम्यान, आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आदी या बैठकीला उपस्थित होते.