१२० उमेदवारांचं भवितव्य मुस्लिम मतदारांच्या हातात
विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या ८ दिवसांवर आलं असून राज्यात प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान नेत्यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने व्होट जिहादच्या केलेल्या आरोपांवर ओेवेसींनी पलटवार केला आहे. भाजपने मुस्लीम मतदान मिळवण्यासाठी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर ओवेसी यांनी याचा संबंध ब्रिटीशांशी जोडला आहे. दरम्यान राज्यातील किती जागांवर राजकीय पक्षांनी मुस्लिम उमदेवार दिले आहेत आणि मुस्लिम मतरांचा यंदाच्या निवडणुकीत किती परिणाम जाणवेल, पाहुया एक रिपोर्ट…
महाराष्ट्रात ११ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. राज्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ३० लाख मुस्लीम समाज आहे. तर विधानसभेच्या १२० जागा अशा आहेत जिथे मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका निभावू शकतात. यातील ६० जागा अशा आहेत जिथे १५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. तर ३८ मतदारसंघात २० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार आहेत. विशेष म्हणजे ९ जागांवर ४० टक्के मतदार मुस्लीम आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकूण मुस्लीम उमेदवारांची संख्या केवळ १६ आहे. तर AIMIM ने १४ पैकी १० जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. विधानसभेत AIMIM चे अद्याप १० टक्केही मुस्लीम आमदार नाहीत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. तर शिंदे गटाने १ अजित पवार गटाने ४, कॉंग्रेस ने ९ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने १ आणि समाजवादी पक्षाने २ मुस्लीम मतदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. विशेष म्हणेज विधासभा निवडणुकीत १५० जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नाही.
महाराष्ट्रात आजपर्यंत मुस्लिम मतदारांचा फायगा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला झाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यावेळी एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही. त्यामुळे मुस्लिम मतदार नाराज असल्याची चर्चा असून याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यातच मुस्लिम मतदारांनी मतदानच करण्याचं टाळलं तर त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ओवीसी यांची खेळ बिघडवू शकते. अजित पवार याचे बहुतेक उमेदवार मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहेत.