लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये पत्रकार संघातर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विनोद तावडे यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते. त्यावेळी विनोद तावडे (BJP Vinod Tawade)यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. तपास यंत्रणेचा दबाव असता तर संजय राऊत सुद्धा भाजपमध्ये आले असते. त्यांच्यासोबत मी राज्याच्या राजकारणात पडणार नाही, सध्या मी दिल्लीमध्ये आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशी आहे, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (BJP Vinod Tawade) यांनी व्यक्त केली आहे.
‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’
देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते. युती म्हणून लढलो तर बाळासाहेबांची मत भेटली. मग तुम्हाला आम्हाला सोडून जाता याला गद्दारी म्हणत नाहीत. आम्ही विचारांवर युती केली होती, असे म्हणत विनोद तावडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली. हे सगळं दबावतंत्र असल्याचं बोललं गेलं मात्र दबावतंत्र असतं तर संजय राऊत देखील भाजपात आले असते, असे विनोद तावडे म्हणाले.
मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी दिल्लीमध्ये आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच असणार आहे. तसेच भाजपसंबंधित सर्व निर्णय केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून घेतले जातील. त्यामुळे घेतले जाणारे सर्व निर्णय विचारपूर्वक घेतले जातील, असे विनोद तावडे म्हणाले. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावर विनोद तावडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणे हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही. शरद पवारांप्रमाणे संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये केले वक्तव्य याआधी महाराष्ट्रामध्ये कधीही ऐकायला मिळाले नाही, असे विनोद तावडे म्हणाले.