बसस्थानकात रहस्यमय पाणी झिरपण्याचा प्रकार (फोटो- सोशल मीडिया)
पाणी नेमके कुठून येत आहे, त्याचा ताळमेळ लागेना
प्रवेशद्वाराजवळच पाणी झिरपत असल्याने सर्वत्र चिखल
सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे खड्डे झाले आणखी मोठे
खेड: खेड बसस्थानकाच्या (KHED) मध्यवती भागात गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या पाणी झिरपत आहे. पाणी नेमके कुठून येत आहे, याचा ताळमेळ न लागल्याने एसटी प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पाण्यामुळे त्या परिसरात दलदल निर्माण होत असून बसस्थानकातील (MSRTC)अस्वच्छतेतही भर पडली आहे. बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळच पाणी झिरपत असल्याने सर्वत्र चिखल झाले आहे. आधीच अनेक ठिकाणी खोल खड्डे पडलेले असताना सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे हे खड्डे आणखी मोठे झाले आहेत. परिणामी बस मार्गस्थ करताना चालकांना अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत असून, दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शोधण्यासाठी तपास सुरू प्रवासी तसेच स्थानिकानी एसटी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर झिरपणाऱ्या पाण्याचा स्रोत शोचण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. मात्र कोणतेही पाईपलाइन फुटलेले नाही, पाण्याचे टाकीगृह किंवा नळजोडणी गळत नाही, जमिनीखाली कोणतीही लाइन तुटलेली नाही, अशा निष्कर्यांमुळे प्रागासनाचे आश्चर्य आणखी वाढले आहे. बसस्थानकातील वाढते खहे. चिखल, अस्वच्छता आणि पाण्याची गुढ झिरप यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत, स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी बसस्थानकाचा तातडीने तांत्रिक तपास करून पाण्याचा उगम शोधण्यची, खड्डे बुजविण्याची आणि स्वच्छतेची सुधारणा करण्याची मागणी एसटी प्रशासनासमोर ठेवली आहे.
मोदी सरकारचे Konkan Railway कडे दुर्लक्ष; पायाभूत सुविधा सोडाच, पादचारी पूल देखील…
स्वच्छतेची दुरवस्था; स्थानक ‘अस्वच्छतेचे केंद्र’
बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे. कचराकुंड्यांची कमतरता, सांडपाणी निचरा न होणे, तुटलेले फरशांचे फलक आणि पावसाळ्यानंतर दुरुस्ती न झालेल्या जागा यामुळे वातावरण अस्वच्छ झाले आहे. त्यात झिरपणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधीही वाढत असून बसस्थानकात थांबणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…
प्रशासनाच्या भूमिकेवर उभे राहिले प्रश्नचिन्ह
स्थानिकांकडून असा आरोपही केला जातो की, बसस्थानकाची दुरुस्ती व देखभाल अनेक वर्षांपासून होत नसल्याने ही समस्या कायम वाढत आहे. मूलभूत सुविधा न मिळाल्याने सखेड बसस्थानक दिवसेंदिवस जीर्णावस्थेत जात असून, पाणीझिरप प्रकरण त्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब करत असल्याची टीका केली जात आहे. खेड बसस्थानकातील हे पाणी रहस्य कायम असून, त्याचा उगम शोधून परिस्थिती सुधारण्याचे आव्हान आता एसटी प्रशासनासमोर उभे आहे.






