आता एसटीतून करा महाराष्ट्र भ्रमंती (फोटो- सोशल मीडिया)
पासमध्ये ५०० ते १ हजाराची प्रवाशांना मिळणार सवलत
आता एसटातून करा महाराष्ट्र भ्रमंती
पासधारकांसाठी आरक्षण देत प्रवासाची मुभा मात्र दर असणार वेगवेगळे
गुहागर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आवडेल तेथे प्रवास योजना सुरू केली. मध्यंतरी एसटीची भाडेवाढ तसेच या योजनेचे दर वाढल्यामुळे प्रवाशांची कमी पैशात महाराष्ट्र भ्रमंतीची संख्या घटली होती. याचाच विचार करून परिवहन महामंडळाने एसटीची आवडेल तेथे प्रवास योजना आणखी स्वस्त केली आहे. आता पुन्हा एकदा ४ ते ७ दिवसांच्या पासेसमध्ये दर कमी केले आहेत, ५०० ते १००० रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह राज्यभरातील जे फिरस्ता, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आहेत त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करण्याची नवी संधी महामंडळांनी निर्माण करून दिली आहे.
एसटीसाठी आता ४ व ७ दिवसांच्या पासचा समावेश
राज्यमार्ग परिवहन महामंडळाने १९८८ मध्ये १० दिवसांसाठी पास देत आवडेल तेथे प्रवास ही योजना सुरू केली, एप्रिल २००६ मध्ये योजनेची पुनर्रचना करण्यात आली. १० दिवसांचा पास रद्द करत ४ व ७ दिवस पासवा समावेश करण्यात आला, पूर्वी ४ दिवसांच्या साध्या एसटीसाठी १८१४ रुपये दर होते. ते आता १३६४ करण्यात आले, तर मुलांसाठी ९१० होते ते ६८५ करण्यात आले.
पुन्हा पासेसचे दर कमी; प्रवाशांना मिळाला दिलासा
मध्यंतरी पासेसचे दर वाढल्यामुळे आवडेल तेथे प्रवास योजनेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली होती, मात्र आता पुन्हा एकदा पासेसचे दर कमी कैल्यामुळे प्रवाशांचा चागला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांनी कमी पैशात महाराष्ट्रभर फिरायचे आहे तर मग आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घेऊन आयाम पर्यटन करू है निश्चित, पर्यटन करणाऱ्या प्रवाशांसाठी पर्वणीच आहे.






