नागपूर : जालन्यात अमानुषपणे लाठीमार मराठा आंदोलकांवर झाला ही दुर्दैवी घटना आहे. मी सुद्धा महाराष्ट्राचा गृहमंत्री राहिलेलो आहे जी माझी माहिती आहे जो लाठीमार मराठा आंदोलकांवर करण्यात आला, हा लाठीमार गृहमंत्र्यांना फोन केल्यानंतर हा लाठीमार करण्यात आला. कारण पोलीस यंत्रणा कोणत्याही वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय इतक्या अमानुषपणे लाठीचार करणार नाही. हा फोन मंत्रालयामधून झाला आहे आणि हे प्रकरण जे वाढत आहे, मराठा समाज एकत्र येत आहे त्यामुळे आता जालन्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवला जात आहे असे अनिल देशमुख म्हणाले.
पण खरा आदेश देणारा कोण मंत्रालयामधून कोणी फोन केला? याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी राज्यशासनाच्या माध्यमातून न होता निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून झाली पाहिजे. तेव्हाच मंत्रालयातून जालना पोलिसांना कोणी फोन केला आणि हा लाठीहल्ला करायला लावला या सर्व गोष्टी पुढे येतील. निवृत्त न्यायाधीशांनी जर याची चौकशी केली तर माझ्या बोलण्यामध्ये किती सत्यता आहे. हे सर्व पुढे येईल. मी गृहमंत्री झालेलो आहे आणि आज जरी नसलो तरी माहिती आम्हाला मिळत असते. पोलीस यंत्रणा कधीही स्वतःहून लाठीहल्ला करत नाही जो पर्यत त्यांना वरिष्ठांचा आदेश नाही तो पर्यत ते याप्रकारे लाठीहल्ला करणार नाहीत असे अनिल देशमुख म्हणाले.