आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख
अतिवृष्टीच्या आस्मानी संकटानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता, सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदा नोव्हेंबर महिना उजेडला तरी शासनाची हमीभाव केंद्र सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मका बेभावाने विकण्याची वेळ आलेली आहे.
यंदा शासन २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करणार आहे. सध्या खुल्या बाजारात मका पिकाला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे, जो की आधारभूत किंमतीपेक्षा ९०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकऱ्यांची होणारी हि लूट थांबवण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभाव केंद्रे सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
यंदा कृषी विभागाच्या आवाहलानुसार नाशिक जिल्ह्यात ४ हजार ८२ हेक्टरवर मका पेरणी झालेली आहे. अद्याप शासनाला मका उत्पादनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण उत्पादनावरच खरेदीचे उद्दिष्ट निश्चित होणार आहे. खरेदीचे उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर ल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदीचे आदेश प्राप्त होणार आहे. सरकारी काम आणि चार दिवस थांब, असाच काहीसा प्रकार मका हमीभाव खरेदी बाबत सध्या तरी दिसून येत आहे. यात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
नोंदणीला प्रतिसाद नसल्याचे स्पष्टीकरण फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात खरेदी ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत केली जाणार होती. परंतु, शासनाच्या सल्लागार समितीकडून या दरम्यान खरेदीबाबत कोणताही आदेश जिल्हा फेडरेशन अर्थात जिल्हा पणनला प्राप्त न झाल्याने खरेदी लांबणीवर पडली आहे. या प्रश्नी मात्र फेडरेशन सावरा सावर करतांना दिसत असून नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच खरेदी सुरु झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.
जिल्ह्यात आधारभूत किमतीने मका खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकान्यांनी १७ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर मका, बजरी, रागी, ज्वारी (संकरित, मालदांडी। खरेदी केली जाणार असून ३० नोवोबरपर्यंत नेमून दिलेल्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नौदगी किती झाली यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खरेदी सुरु होईल. किती मका खरेदी करायची या बाबत अजून स्पटता नाही, शासनाकडून आदेश प्राप्त होताच खारेदी सुरु केली जाईत,
– बी. आर. पाटील, जिल्हा पणन अधिकारी,
आतापर्यंत मका खरेदी सुरु होणे अपेक्षित होते. खरे तर शासनाकडे हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणाच उपलब्ध नाही. हमीभावाने खरेदी करण्यापेक्षा भावांतर योजना योग्य पर्याय आहे. हि योजना राबवली तर शेतकऱ्यांना खऱ्या फायदा होईल.
-अर्जुन बोराडे, शेतकरी समन्य समिती,






