संग्रहित फोटो
महापालिकेत ज्या पक्षाचे जितके जास्त निवडून आलेले प्रतिनिधी असतात, त्या प्रमाणात त्या पक्षाला स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार मिळतो. यंदाच्या या निवडीमध्ये भाजपने आपले वर्चस्व राखत 7 जागांवर नावे निश्चित केली आहेत.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक
निलेश कोंढाळकर
प्रियंका शेंडगे
विश्वास नानावरे
राजेंद्र काकडे
रवी साळेगावकर
जयप्रकाश पुरोहित
उदय लेले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर)
राकेश कामठे
काँग्रेस
सुनील शिंदे
इच्छुकांची संख्या वाढली होती
महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. काहींना एबी फॉर्म देऊनही शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यात आली, तर काहींची उमेदवारी स्थानिक राजकीय समीकरणांमुळे रद्द झाली. काही ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. स्वीकृत सदस्यपद मिळाल्यास नगरसेवक म्हणून ओळख मिळते. तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पातून काही निधी विकास कामांसाठी मिळतो. त्यामुळे स्वीकृतसाठी इच्छुकांची संख्या वाढली होती. आज अखेर तिनही पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहे.






