नाशिक (वा.) : जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे तसेच वसतिगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची घाेषणा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेना आढावा बैठकीत सर्व मािहती घेतल्यानंतर त्यांनी ही घाेषणा केली.
म्युकरमायकाेसिसचा रुग्ण नाही
ते पुढे म्हणाले, रुग्णसंख्या १८ हजार ५०० वरून १५ हजार ५०० वर आलेली असून, ३ हजाराने रुग्णसंख्या घटली. पॉझिटिव्हिटी रेट ४१ टक्क्यांहून २७ टक्क्यांवर आला आहे. यासोबतच म्युकरमायकोसिस एकही रुग्ण नाशिक शहरात नाही. दुसरीकडे शाळा सुरू झालेल्या असून, कुठेही मुले बाधित झालेले नसल्याचे चित्र आहे. प्राधान्याने लसीकरण वाढविण्याची आवश्यकता असून, विशेषतः मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात मोबाईल व्हॅन पाठविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांची अडचण दूर हाेणार
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरीदेखील रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी पावले उचलली जात असून, कोरोना नियमांचे पालन करत पर्यटनस्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री भुजबळ यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांची अडचण होत असून, वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मालेगावमध्ये लसीकरण कमी असल्याने याठिकाणी लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्हॅक्सीन आता मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याने कायमच शासन आता मोफत स्वरूपात व्हॅक्सीन मिळणार नाही. त्यामुळे मोफत व्हॅक्सीन लवकरात लवकर घेण्यात यावे.