सावन वैश्य | नवी मुंबई:- वाशी सेक्टर 9 मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने एका उभ्या गाडीला धडक दिली आहे. या धडकेत वाहन चालक संभाजी गणपत पाटील, यांसह दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्हीही विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे.
वाशीत स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. दुपारी साधारण 1 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान स्कूल व्हॅन चालक याने, सेक्टर नऊ वरील रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थ्याच्या पायाला, तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली. दोनही जखमी विद्यार्थ्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच वाहन चालक देखील यात जखमी झाल्याने त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक स्कूल व्हॅन मध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली करून, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. मात्र संबंधित प्रशासनाकडून या बेशिस्त वाहन चालकांवर कोणती कारवाई होत नाही. एखादी अप्रिय घटना घडल्यावरच वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का.? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
वाहन कायद्यानुसार प्रत्येक प्रवाशाने सुरक्षा पट्ट्याचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच या व्हॅनमध्ये परवानगी पेक्षा अधिक क्षमतेने विद्यार्थी बसवले जातात. तसेच शाळेत पोहोचायला उशीर झाल्यावर शाळेतून चालकांना ओरडा खावा लागतो, म्हणून चालक हे वाहन वेगाने चालवतात. त्यामुळे शाळा प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता थोडा उशीर झाला तर त्यांना सवलत द्यावी. वाशी परिसरात विविध संस्थांच्या शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फ वाहन पार्क असल्याने या ठिकाणाहून जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याकडे देखील वाहतूक विभागाने लक्ष घालून काहीतरी उपाययोजना करावी.