मुंबई – राज्यसभेचा (Rajya Sabha election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीने राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट (Shinde group) व भाजपने(BJP) आपले उमेदवार जाहीर केले. भाजपचे तीन व शिंदे गटाचा एक असे उमेदवार जाहीर झाले. यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी (NCP) पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार सुनील तटकरे (MLA Sunil Tatkare) यांनी राज्यसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार म्हणून अनुभव असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. आमदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल हे आता त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणूकीचा अर्ज भरणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणूकीवर राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार आहे.
पक्षाकडे एकूण दहा नावं होती. त्यातील वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे. तांत्रिक बाबींमुळे प्रफुल्ल पटेल यांनाच उमेद्वारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. यासाठी लागणारी महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिंदे गटाची संमती घेतली आहे. उद्या दुपारी 12.30 वाजता अर्ज भरण्य़ात येणार आहे.