अनिल देशमुखांची पत्रकार परिषद (फोटो-सोशल मिडिया )
नागपूर: महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अवकाळी पाऊस, लाडकी बहीण योजना आणि महिला आयोगावर भाष्य केले आहे.
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, “लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत निर्णय घेताना पक्ष हा स्थानिक राजकारण कसे आहे आणि त्यावेळची राजकीय स्थिती काय आहे यावर निर्णय घेतो. एखाद्या जिल्ह्यात राजकीय स्थिती पाहून युती होऊ शकते काही ठिकाणी युती होऊ शकत नाही. मनपा, नगरपालिका महाविकास आघाडीसोबत लढायची का यावर प्रत्येक चाचपणी केली जात आहे.”
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहे. संजय राऊत जे बोलत आहे त्यात सत्यता नाही. त्यांच्याकडे जी माहिती असेल त्यावर ते बोलत असतील. प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्याशी कालच माझी भेट झाली, त्यात यावर काही चर्चा झालेली नाही.”
“राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नरखेड, काटोल भागात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर मदत द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यांना लवकरात लवकर मदत करावी, असे देशमुख म्हणाले.
बोगस शिक्षक भरतीवरून अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात
अनिल देशमुख म्हणाले, “नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघडकीस आला आहे. हा घोटाळा तर व्यापमपेक्षा मोठा घोटाळा दिसून येत आहे. 20 ते 30 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्त्या झाल्या.” नागपूर जिल्ह्यात 1058 शिक्षक बोगस असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.
“शाळा कोणती आहे, हे सुद्धा…”; बोगस शिक्षक भरतीवरून अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “माझी शाळा कोणती आहे, हे सुद्धा अनेक शिक्षकांना माहीत नाही. अनेक ठिकानो बोगस नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात हजारो कोटींचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले पाहिजे. मात्र ते दुर्लक्ष का करत आहेत हे समजत नाही. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाईजे. मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत. त्यांच्याच शहरात हे घडले आहे.”