राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ट्विटर)
नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती, सरन्यायाधीश भूषण गवई, शरद पवार – अजित पवार यांच्यावर देखील भाष्य केले आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघडकीस आला आहे. हा घोटाळा तर व्यापमपेक्षा मोठा घोटाळा दिसून येत आहे. 20 ते 30 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्त्या झाल्या.” नागपूर जिल्ह्यात 1058 शिक्षक बोगस असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “माझी शाळा कोणती आहे, हे सुद्धा अनेक शिक्षकांना माहीत नाही. अनेक ठिकानो बोगस नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात हजारो कोटींचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले पाहिजे. मात्र ते दुर्लक्ष का करत आहेत हे समजत नाही. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाईजे. मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत. त्यांच्याच शहरात हे घडले आहे.”
शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सरू आहे. मात्र हे खरे नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. 3 ते 4 वर्षनंतर निवडणुका होणार आहेत. वरिष्ठ पातळीवर एकत्र येण्याची चर्चा नाही. मात्र तसे काही ठरल्यास सांगितले जाईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…? शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.