ठाणे : शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून शिंदे गट (Shinde Group) वेगळा झाल्यानंतर दोन्ही गटांत सातत्याने वाद होताना दिसत आहे. त्यात ठाण्यात दोन गटात राडा झाला होता. शिंदे गटाने ठाकरे गटातील पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर आता याविरोधात महाविकास आघाडीकडून जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित आहे.
रोशनी शिंदे मारहाण केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा आयोजित करण्यात आला. यामध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘माझ्या मुलीला सारख्या धमक्या येत होत्या मी आणि एकनाथ शिंदे यांनी 30 वर्षे सोबत एकाच शहरात राजकारण केले आहे. आमचे वैचारिक मतभेद असतील. मात्र, त्यांनी एकही कॉल केला नाही. आहेर यांच्याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल नाही.
तसेच रोशनीने पोस्टमध्ये अश्लील भाषा वापरली नाही. रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, तिच्या पोस्ट शिवसेनेच्या संस्करातील होत्या. तिने आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. गर्भाशयाचे ऑपरेशन सुरू आसताना तिला मारले गेले हेच तुमचे संस्कार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.