बारामती – लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. पक्षांच्या बैठका, प्रचारसभा वाढल्या असून उमेदवारांची यादी देखील जाहीर केली जात आहे. दरम्यान शरद पवार गट देखील आगामी निवडणूकांसाठी जोरदार तयारीला लागला आहे. शरद पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ऑफिशियल अकाऊंटवरुन ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्यासह अनेक महत्त्वांच्या नेत्यांचा समावेश आहे.
शरद पवार गटाकडून पाच उमेदवार जाहीर
शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या सर्व उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला जाणार आहे.
कोणत्या नावांचा समावेश?
राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपल्या ४० स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत खालील नावे आहे.
अमोल कोल्हे, निलेश लंके, राजेश टोपे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय, फौजिया खान, पी. सी. चाको, धीरज शर्मा, वंदना चव्हाण, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, पार्थ पोळके, ऍड. जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, अशोक पवार, अरुण लाड, प्राजक्त तानपुरे, सुनील भुसार, नसीम सिद्दीकी, विकास लवंडे, रोहित पाटील, राजू आवळे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, पंडित कांबळे, रवी वरपे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर आणि पूजा मोरे यांचा समावेश आहे.