मंत्री नितेश राणे (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात 15 तारखेला होणार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान
मंत्री नितेश राणे यांनी ठाण्यात केले विधान
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली
Muncipal Election Result 2026: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान होणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत संपली आहे. दरम्यान आज ठाण्यात मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीसंदर्भात एक भाष्य केले आहे.त्या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. राणे नेमके काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात.
मंत्री नितेश राणे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच राणे यांनी ‘जय श्री राम’ आणि महापौर पद यांचा संबंध जोडला आहे. त्याबाबत त्यांनी असे विधान केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
#WATCH | Thane: Maharashtra Minister Nitesh Rane says, "In all 29 municipal corporations, only mayors who chant 'Jai Shri Ram' will be seen seated; you will see a 'bhagwa may' atmosphere everywhere…I urge the voters that tomorrow is Makar Sankranti, and many people go to their… pic.twitter.com/ISBAGlaxUS — ANI (@ANI) January 13, 2026
काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
महाराष्ट्र सरकारमध्ये नितेश राणे मंत्री आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ‘जय श्रीराम’ म्हणणारेच महापौर पदाच्या खुर्चीवर बसलेले दिसतील. आगामी निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण ‘भगवे’ होईल, असे मंत्री राणे म्हणाले. तसेच त्यांनी गुजराती आणि मारवाडी समाजाला देखील आवाहन केले आहे. मकर संक्रांतीला गावी न जाता सनातन धर्म, राष्ट्र सुरक्षेसाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मशीद आणि अजानच्या नावावर घाबरवले जात असून, त्याचे उत्तर हिंदू समाज एकत्रित येऊन मतदान करून देईल, असे मंत्री राणे म्हणाले.
Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट
उबाठाच्या दुटप्पीपणावर उद्योग सामंत यांची सडकून टीका
मराठी भाषेचा कैवार घेऊन राजकीय पोळी भाजून घेणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. मविआ सरकारच्या काळात मराठीला बाधक काम उबाठाने केले, अशी सडकून टीका राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यात जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. अंगणवाडी, बालवाडी, शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय बदल करावेत यासंबधी माशेलकर समितीने अहवाल सादर केला होता. या अहवालात जितक्या शिक्षण संस्था आहेत तिथं मराठीतून अध्ययनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण विकसित केले गेले आहे. त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदीचे अध्यापन अनिवार्य केले पाहिजे, तसेच महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन ते चार वर्षांतही इंग्रजीबरोबर हिंदी अनिवार्य, सक्तीचे केले पाहिजे, असा या अहवालात उल्लेख आहे. हा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता. त्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंनीच घेतला, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.






