File Photo : GBS
पुणे : राज्यातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात ही रुग्णसंख्या 127 वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरात दोन-तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात शहरात गुरुवारी जीबीएसची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, बुधवारी या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या दोनवर पोचली आहे.
हेदेखील वाचा : Dhananjay Munde : भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी; महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्रींनी मांडली स्पष्ट भूमिका
ससून सर्वोपचार रुग्णालयात 56 वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यात मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण ठरला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 होती. यात रात्री उशिरापर्यंत वाढ झाली. ती 130 पर्यंत पोचली आहे. यामुळे चिंता निर्माण झाली होती. गुरुवारी मात्र एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील 130 संशयित रुग्णांपैकी 73 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या जुन्या हद्दीतील 25 समाविष्ट गावांतील 74 रुग्णांचा समावेश आहे. तर 13 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तर 9 रुग्ण हे ग्रामीण भागातील आणि 9 रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे 121 रुग्णांचे शौच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 21 नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणूसंसर्ग आणि ५ नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूसंसर्ग आढळला आहे.
नमुने पाठवले तपासणीसाठी
याचबरोबर 25 रुग्णांचे सेरेब्रोस्पायनल फ्लुईडचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात एका नमुन्यांमध्ये इपस्टीन बार विषाणूसंसर्ग आढळला आहे. तसेच, 200 रुग्णांच्या रक्त नमुन्यांमध्ये झिका, डेंग्यू आणि चिकुनगुन्या संसर्ग आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण
शहरातील सिंहगड रोड, नांदेड सिटी परिसरात जीबीएस या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याची बाब समोर आली होती. या भागात असलेल्या विहिरीतून दूषित पाण्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याचे सांगितले जात होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आज येथील भागात केंद्राचे ७ सदस्यांचे पथक पाहणी करण्यासाठी येथे आले होते. मात्र, गावातील नागरिकांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या करत पाहणी करायला आला आहात आणि पाहणी न करताच चालला आहात असा आरोप केला. तसेच अधिकाऱ्यांना गराडा घातला होता.
हेदेखील वाचा : पहिल्याच बैठकीत पालकमंत्री गोरेंचा धडाका; आरोग्य अन् क्रीडाधिकारी रडारवर, एसटी विभाग नियंत्रकांना नोटीस बजावण्याचे आदेश