मुंबई : देशाचा अमृत महोत्सव सर्वंत्र साजरा होत असताना, (75 Independence Day) देशात सद्या स्वांतत्र्यमय वातावरण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उद्यापासून १५ ऑगस्ट २०२२ घरोघरी तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. (Tiranga campaign) या निमित्ताने मुंबईची जागतिक ओळख असलेल्या आणि राणीचा कंठहार (क्वीन्स नेकलेस) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह (marine drive) परिसरात एकूण २८ निवासी इमारतींवर महानगरपालिकेच्या (Mumbai Palika) वतीने विद्युत रोषणाई (Electric lighting) केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी कॉर्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वातून प्राप्त झाला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांची महानगरपालिका मुख्यालयात भेट घेऊन त्याचे धनादेश दात्यांनी सुपूर्द केले. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा आणि उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव हे देखील उपस्थित होते.
[read_also content=”नुकसानभरपाईचे धोरण का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, नायजेरीयन आरोपींला २ लाख भरपाई देण्याचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/why-no-compensation-policy-in-state-court-question-ask-to-state-government-315318.html”]
दरम्यान, घरोघरी तिरंगा अर्थात “हर घर तिरंगा” अभियान मुंबई महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. या निमित्ताने मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगा स्वरुपातील विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असणार आहे. मरीन ड्राईव्ह येथील एकूण २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर महानगरपालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन महानगरपालिकेने यापूर्वीच केले आहे.