पुणे : मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेना अध्यक्ष तानाजी वाळंज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी 9 .00 वाजता शिवस्मारक पौड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी 4.00 वाजता पौड ते घोटावडे फाटा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य अशी मिरवणूक होणार आहे. यावेळी खासदार संभाजी राजे भोसले ,खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्राम थोपटे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष करणभाऊ गायकर, मुळशी तालुका सभापती पांडुरंग ओझरकर व मोठ्या प्रमाणावर शंभु भक्त उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 5.00 वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर मुळशी तालुक्यातील कीर्तनकार ,गायक , मृदुंगमनी, पत्रकार ,सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार खासदार संभाजीराजे भोसले व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा ,भव्यदिव्य मिरवणूक, पुरस्कार सोहळा यासाठी संपूर्ण राज्यातील शिवभक्तांनी उपस्थित राहावं असे आवाहन अध्यक्ष तानाजी वाळंज यांनी केलं.
[read_also content=”अखेर पाणीपुरवठा विभागासाठी सल्लागार म्हणून निवृत्त अधिकारी प्रवीण लडकत नियुक्त https://www.navarashtra.com/maharashtra/finally-praveen-ladkat-a-retired-officer-was-appointed-as-a-consultant-for-the-water-supply-department-nrdm-283761.html”]
यावेळी पत्रकार परिषदेला मुळशी तालुका अध्यक्ष तानाजी वाळंज,युवक अध्यक्ष रोशन सोंडकर, सचिव विठ्ठल पवार, उपाध्यक्ष विकास खैरे, उपाध्यक्षा सारिका ताई येनपुरे,कार्याध्यक्ष दादा दहीभाते, उपाध्यक्ष किरण परशेट्टी, व महिला कार्याध्यक्षा सुजाता ओहळे उपस्थित होते.