ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार, कर्मचारी संघटना आक्रमक, कोणत्याही क्षणी...
मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांना निराश करणारा एक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना मार्चचा केवळ ५६ टक्के पगार मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, त्यामुळे एसटी कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बच्चू कडू-अजित पवार यांच्यात खडाजंगी; आंदोलनातील सहभागावरून चांगलीच जुंपली
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेहमीच रखडला जातो. आधीच अपुरा पगार आणि त्यात फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित केला आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जर सरकारने हा निर्णय मागे घेतवा नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले की, आधीच अपुरा पगार आणि त्यात फक्त 56 टक्के पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यात 2018 पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. हायकोर्टाचे भत्ता एकरकमी द्या असे आदेश दिले आहेत, तरी कर्मचाऱ्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला होत नाहीत. पगाराची कोणतीही निश्चित तारीख नाही. एसटीचं रोज सरासरी 22 कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला 660 ते 700 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे.
अनधिकृत ‘प्लॉटिंग’धारकांचे धाबे दणाणले; आळंदीत पाच एकर ‘प्लॉटिंग’वर ‘पीएमआरडीए’ची कारवाई
कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारासाठी केवळ 440 कोटी रुपये लागता. मात्र उत्पन्न 700 कोटी असूनही पूर्ण पगार आणि जो पगार दिला जातो तोही वेळेवर नाही. तालुकास्तरावर घरभाडं 8 टक्के असूनही 7 टक्केच दिलं जातं, मात्र तेही वेळेवर दिलं जात नाही, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.