परभणी: परभणीत मॉब लिंचिंगची (Parbhani Mob Lynching) घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण (Beating In Parbhani) केली. यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री हे तरुण गावातून जात असताना उशिरा ही घटना घडली. (Crime News)
संशयाने केला घात
घटनेबाबत परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी सांगितलं की, कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. ग्रामस्थांना तिघेही चोर असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली. यापैकी कृपानसिंगचा नंतर मृत्यू झाला. तो अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
मारहाण केल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांना केला फोन
या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, ग्रामस्थांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून तीन चोरांना पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तिघांचीही जमावापासून सुटका केली. या तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
पोलिसांनी चौघांना केली अटक
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 4 जणांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गावचे माजी सरपंच अक्रम पटेल यांनाही अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.