व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Joung UN ची घाबरगुंडी? North Korea ने केली क्षेपणास्त्र चाचणी (फोटो सौजन्य: ai जनरेटेड)
Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
ही चाचणी अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर (Venezuela) हल्ला करत गुप्त कारवाई केली होती. अमेरिकेने (America) व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. यानंतर उत्तर कोरियाने हायपरसॉनिक मिसाइल टेस्ट केल्याने तज्ज्ञांनी हे केवळ शक्ती प्रदर्शन असल्याचे म्हटले आहे. तर काहींच्या मते, अमेरिकेच्या हल्ल्याच्या भितीने उत्तर कोरिया युद्धाच्या तयारीला लागले असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान उत्तर कोरियाचा सर्वात मोठा शत्रू दक्षिण कोरियाने (South Korea) यावर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर कोरियाच्या अशा प्रकारच्या चाचण्यांना दक्षिण कोरियाने युद्धासाठी उकसवणारी चिथावणी म्हटले आहे. या प्रभोक्षक कृतींचा विरोध करत दत्रिण कोरियाने गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण कोरियाचे मते, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने अनेक वेळा केली आहे. हे केवळ त्यांची ताकद दाखवण्यासाठी करत आहेत. किम जोंग उन जगभरात शक्तीप्रदर्शन करत असल्याचा तज्ज्ञांना दावा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर परिषदेला जाणार आहे. याच वेळी या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार, चीन आणि उत्तर कोरियामधील सरावाची ही तयारी आहे. यासाठी शस्त्रांची, दलांची, अग्निशकिती आणि ऑपरेशनल कौशल्ये वाढवण्याची तयारी चीन (China) आणि उत्तर कोरिया करत आहे. हे संकेत स्पष्टपणे मोठ्या युद्धाकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान या क्षेपणास्त्र चाचणीवर बोलताना किम जोंग उन यांनी म्हटले आहे की, आम्ही या क्षेपणास्त्र चाचण्या राष्ट्रीय संरक्षणासाठी करत आहोत, आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. त्यांनी लष्करी ताकदीच्या अत्याधुनिकतेवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांच्या सैनिकांना म्हटले आहे. या यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरियाला अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरोधात अधिक ताकदवार होत आहे. तसेच उत्तर कोरियाने व्हेनेझुएलावरील कारवाईचाही विरोध केला आहे.






