खासदार निलेश लंके पीसीएमसीमध्ये एनसीपी उमेदवार सारिका गणेश कस्पटे यांच्यासाठी बैलगाडीवरुन प्रचार केला (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections : पिंपरी : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी रंगली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. 29 पालिकांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांचा (Political News) जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युती असून राजकारण रंगले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असले आहे. जनतेच्या मनात मात्र निर्णय जवळपास ठाम झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सारिका गणेश कस्पटे यांच्या वाढत्या प्रतिसादाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कस्पटे आणि राष्ट्रवादी पॅनेल उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके आले होते. निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी समर्थक आणि मतदारांची गर्दी हा विरोधकांना धडकी भरवणारी आहे.
खासदार निलेश लंके यांनी खास बैल गाडीतून उमेदवारांचा प्रचार केला. उमेदवार सारिका कस्पटे, तुषार कामठे, संकेत जगताप आणि सीमा साठे या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या बैलगाडीवरुन केलेल्या प्रचाराची जोरदार चर्चा रंगली.
हे देखील वाचा : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या सामाजिक कामामुळे सारिका कस्पटे यांनी केवळ निवडणूक काळातच नव्हे, तर कायमस्वरूपी जनतेसोबत राहणारे नेतृत्व म्हणून विश्वास संपादन केला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महिला व ज्येष्ठांचे प्रश्न, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी अखंडपणे केलेला पाठपुरावा आज मतदारांच्या निर्णयामागील प्रमुख कारण ठरत आहे.
प्रभाग क्रमांक २६ मधील अनेक नागरिकांनी “आता आमचा नगरसेवक कोण असावा हे आम्ही ठरवले आहे” असे खुलेपणाने सांगण्यास सुरुवात केली असून, हा जनमताचा सूर विरोधकांच्या गोटातही चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता, जनतेच्या विश्वासाची थेट लढाई ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा
विकास, पारदर्शकता आणि स्वच्छ प्रशासन या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या सौ. सारिका गणेश कस्पटे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाखाली निवडणूक रिंगणात असून, प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.






