आता नो टेन्शन! अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, कसं ते जाणून घ्या...
वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघ्या ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर होणार आहे. यासंदर्भातील सरकारी निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे. यामुळे ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार संयुक्त धारण केलेल्या जमिनीत एकापेक्षा जास्त सह-धारक असतील तर त्यांना जमिनीतील त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येते. मालकी हक्काबाबत वाद असेल तर दिवाणी न्यायालयीन खटला दाखल होईपर्यंत वाटणी थांबते. आदेशानंतर वाटणीची कार्यवाही फक्त तहसीलदारांमार्फत केली जाते आणि यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही .
तसेच संमती देणारे वडील त्यांच्या मुलांना जमीन आणि मालमत्ता देत असतील त्यासाठी एक किंवा दोन टक्के सेंट स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क आणि २०० ते ५०० रुपये स्टॅम्प पेपर लागतो. परंतु, महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर, कोणतेही शुल्क न भरता अवघ्या ५०० रुपयांत वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार आहेत. सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्याठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल, असं सांगण्यात आलं.
सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र केले जाते. यासाठी, एक टक्के नोंदणी शुल्क आणि ५०० रुपये स्टॅम्प खर्च आवश्यक आहे. मालमत्तेसाठी फक्त दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नोंदणी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आता बदल होणार आहे,परंतु सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारी निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती विभागाकडून मिळत आहे.
वडिलांची मालमत्ता मुलांना हस्तांतरित करण्यासाठी वाटणीपत्र, बक्षीसपत्र जारी केले जाते. या अंतर्गत, दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन इतरांप्रमाणे नियमित मुद्रांक शुल्क भरण्याचा कोणताही खर्च नाही.
वडिलांच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी, नोंदणी शुल्क 1,000 ते 3,000 रुपये (जमिनीच्या बाजारभावानुसार) आणि मुद्रांक शुल्क 500 रुपये आहे.त्यावर प्रॉपर्टीचा हिस्सा मुलांच्या नावे करता येतो.
जमिनीचा काही हिस्सा मुलीच्या किंवा बहिणीच्या नावे करताना बक्षीसपत्र करावे लागते. त्यासाठी एक टक्का स्टॅम्प ड्यूटी व २०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागतो.
वडिलांच्या नावावरील प्लॉटमधील हिस्सा मुला-मुलींच्या नावे करण्यासाठी दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते. तसेच एक टक्का नोंदणी शुल्क देखील भरावे लागते.
Ans: स्टॅम्प पेपर हा सरकारने जारी केलेला अधिकृत दस्तऐवज आहे जो स्टॅम्प ड्युटी भरल्याची पुष्टी करतो, कायदेशीर कागदपत्रांवर लादलेला एक प्रकारचा कर. तो करार असो, करार असो किंवा मालमत्ता करार असो, स्टॅम्प पेपर वापरल्याने तो दस्तऐवज कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आणि अंमलात आणण्यायोग्य असल्याची खात्री होते .
Ans: कर्ज करार: कर्जदार आणि कर्जदारांमधील करारांमध्ये वापरले जाते, विशेषतः वैयक्तिक कर्जे किंवा असुरक्षित कर्जांसाठी . गृहकर्ज दस्तऐवजीकरण: कर्जदार आणि कर्जदारांमधील अटी आणि शर्ती औपचारिक करण्यासाठी गृहकर्ज दस्तऐवज आणि गृहकर्ज करारांमध्ये स्टॅम्प पेपर वापरले जाऊ शकतात.
Ans: १८९९ पासून भारतीय मुद्रांक कायद्याअंतर्गत भारतात ही प्रणाली वापरली जात आहे. महसूल मुद्रांकांबद्दल जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी: जेव्हा रोख व्यवहार ₹५,००० पेक्षा जास्त असतात, मग ते भाडेपट्टा, कर्ज पावत्या किंवा कमिशन असोत तेव्हा हे मुद्रांक अनिवार्य होतात.






