संभाजीराजे छत्रपती असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी फोडली आणि घोषणाबाजी केली. हा हल्ला संभाजीनगर येथे झाला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याची पार्श्वभुमी ही जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वकत्वाशी आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी विशाळगडवरील दंगलीमुळे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टिका केली होती. संभाजीराजेच्या अंगात शाहू महाराजांचे रक्त वाहत का? हे तपासावे लागेल असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संभाजीराजांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात होता. या संतापातूच स्वराज्य संघटनेने संभाजीनगर येथे आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला.
स्वराज्य संघटनेने जारी केली व्हिडिओ क्लिप
स्वराज्य संघटनेने या संबंधी एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे . त्यामध्ये संघटनेकडून हल्याची जबाबदारी स्वीकारली आहे “जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”, असे वक्तव्य स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे.
नेमके काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. या आंदोलनात काही समाजकंटकांकडून गडावर तोडफोड झाली.त्या पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आव्हाड म्हणाले, संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपंरपरागत जो अधिकार मिळाला होतो, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय आहे? हे तपासण्याची गरज आहे.शाहू महाराजांच्या घराण्यातील व्यक्तीच्या वक्तव्याने दंगल होऊ शकते. तो शाहु महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही.