सोलापूर : भारताला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार वाचवतील, असे अन्न, औषध व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
छगन भुजबळ सोलापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण करण्यात येत आहे. धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
वाढत्या महागाईवरून पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. ‘कैसा लगता है, अच्छा लगाता है’ या फिल्मी गाण्याची आठवण भाषणातून करून पेट्रोल शंभरी पार, गॅसचा भाव १ हजारांच्या पुढ़े जात आहे, असे म्हणत त्यांनी कैसा लगता है, असा प्रश्न सोलापूरकरांना विचारला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भुजबळ यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा सोलापूर दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांचा मंत्री थोरात यांनी खरपूस समाचार घेतला.