Photo Credit- Social Media पीएमपी बसच्या प्रवासीसंख्येत घट;४७ कोटी रुपये उत्पन्न कमी
पुणे, (वा.) अपुरी बससंख्या, मार्गावर वेळेवर बस नसणे, जुन्या बस रस्त्यात बंद पडणे, वेळेचे नियोजन नसणे या विविध कारणांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गेल्या आर्थिक वर्षांत दोन कोटी २९ लाख प्रवासी संख्येत घट झाली आहे. शिवाय प्रवासी घटल्याने यंदा ४७ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले. यामुळे पीएमपीची संचालन तूट वाढणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या दैनंदिन १ हजार ७०० बस शहरातील विविध मार्गावर धावतात.
गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पीएमपीची संचालन तूट वाढत आहे. त्यामुळे पीएमपीची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. पीएमपीची संचालन तूट वाढल्यामुळे खर्च कमी करण्याकडे भर दिला जात आहे; पण प्रत्येक महिन्यात प्रवासी संख्या कमी होत गेल्याचे दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पीएमपीच्या ताफ्यातील कमी झालेली बससंख्या. येत्या काळात बस संख्या वाढणार आहे. त्यामुळे – उत्पन्नात वाढ होईल का? हे पाहावे लागणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर; RSS ची आहे ‘ही’ इच्छा
प्रवासी १२ वरून १० लाखांवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बससंख्या वाढविणे गरजेचे आहे; परंतु बस कमी असल्याने प्रवाशांवर परिणाम होत आहे. गेल्या वर्षी दिवसाला १२ लाखांच्या पुढे गेलेली प्रवासी संख्या आता दहा लाखांवर आली आहे. शिवाय गर्दी असताना अनेक मार्गांवर बसची कमतरता आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे.
जुन्या बसमुळे प्रवासी वैतागले गेल्या वर्षी पीएमपीच्या ताफ्यातील बसची घटना घडली होती. शिवाय स्वमालकीच्या ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली तरी मार्गावर सोडण्यात आले होते. त्यामुळे या बस सतत बंद पडत आहेत. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. शिवाय बसची संख्या कमी झाल्यामुळे काही मार्गांवरील फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
Padma Award 2026: पद्म पुरस्कार 2026 साठी नामांकन प्रक्रिया सुरू; कोण करू शकतो अर्ज?
दरम्यान, शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी लवकरच पीएमपीच्या बसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत. या योजनेला मंजुरी मिळाल्यास, पीएमपीएमएल ही देशातील पहिली AI तंत्रज्ञानाचा वापर करणारी सार्वजनिक वाहतूक संस्था ठरणार आहे.
या नव्या योजनेनुसार, पीएमपी बसमध्ये बसवण्यात येणाऱ्या AI कॅमेरांपैकी एक कॅमेरा थेट स्टिअरिंगजवळ लावण्यात येईल. या कॅमेऱ्याद्वारे बस चालकाच्या हालचालींवर देखील सतत निरीक्षण ठेवता येणार आहे. काही अपघात हे चालकाच्या चुकीमुळे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घडल्याची नोंद आहे. अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हे AI कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.