Police Action Against Gamblers A Case Has Been Registered Against 14 Persons Nrdm
मटका, जुगार खेळणाऱ्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई; १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
बेटींग, जुगार, मटक्यावर तालुका पोलिसांच्या पथकाने एकाच रात्रीत ५ ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १४ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पंढरपूर : बेटींग, जुगार, मटक्यावर तालुका पोलिसांच्या पथकाने एकाच रात्रीत ५ ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १४ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
१६ मे रोजी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नवी पेठ येथील जुन्या भाजी मंडईच्या जागेत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून संदीप झडे (रा. उत्पात गल्ली) आणि दिनेश परदेशी (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) यांना ताब्यात घेतले. तसेच याठिकाणाहून ६ हजार ६६० रुपये आणि एल इ डी टीव्ही, ७ संगणक, २ मोबाईल, कि बोर्ड, माउस, स्कॅनर, प्रिंटर असे साहित्य मिळून एकूण ५० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान नवी पेठेतील व्यापारी कमिटीच्या मारुती मंदिरालगत असेलल्या एका टपरीवर छापा टाकला असता रोख रक्कम ६ हजार ६८० रुपये, मोबाइल असे १९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी काळुंखे, प्रशांत परदेशी, संजय ननवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षक सोसायटीच्या बाजूस असलेल्या टपऱ्यावर छापा टाकून रोख ११ हजार १६० रुपये आणि ३ मोबाईल असा ३९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संग्राम बागेवाडीकर, बाळू बागेवाडीकर, किशोर दत्तू शिंदे, शिवाजी आप्पा कोळी, महादेव धोत्रे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे ढाबे दणाणले असून, पंढरपूर तालुक्यासह मंगळवेढा सांगोला येथेही जुगार अड्यावर त्यांनी छापा टाकल्याने अवैधंदे चालवणाऱ्या जिल्ह्यातील सर्व लोकांनी आपले धंदे बंद केले असून पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांचा कार्यकाल संपल्यानंतरच धंदे सुरू केले जातील, अशी चर्चा आता नागरिकांतून होऊ लागली आहे.
Web Title: Police action against gamblers a case has been registered against 14 persons nrdm