हिंजवडी आयटी पार्क वाहतूक कोंडीची पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पाहणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र))
पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हा चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणी अनेक कंपन्या असून कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी रस्त्यांची पाहणी केली. या दौऱ्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुचवत काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी चुकीच्या दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीवर बंदी आणण्यासाठी सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) बसविण्यात आले. काही रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा प्रयोग, वाहतूक वळवणे, अतिक्रमण हटवणे आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी रोहित्र (डीपी) हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या. या उपाययोजनांमुळे तरी हिंजवडी भागातील वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या पाहणी दौऱ्यात सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पीएमआरडीएचे अपर आयुक्त दीपक सिंगला, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, परिमंडळ तीनचे उपायुक्त विशाल गायकवाड, वाकडचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तसेच #UnclogHinjawadiITPark मोहिमेचे समन्वयक सचिन गुणाले आणि सचिन लोंढे सहभागी होते. याशिवाय महावितरण, पीएमपीएमएल व एमआयडीसीचे अधिकारीही उपस्थित होते.
महत्वाच्या ठिकाणी केलेल्या पाहणीत काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूकमध्ये आणि रस्त्यांमध्ये थोडेफार बदल सुचवण्यात आले आहेत. ते बदल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
५७ पानी सविस्तर अहवाल सादर
हिंजवडी आयटी पार्क अनक्लोग करा’ मोहिमेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या ५७ पानी अहवालात नागरिकांच्या सह्या, वाहतूक कोंडीची ठिकाणं आणि उपाययोजना यांचे जिओ-टॅगिंग केलेले आहे. हे सूचक दस्तावेज पोलिस आयुक्त विनय चौबे यांना हिंजवडी पोलिस ठाण्यात सादर करण्यात आले. या मोहिमेमुळे पुढील तीन ते चार महिन्यांत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास मोहिमेचे संयोजक सचिन लोंढे यांनी व्यक्त केला.
वाहतूक बदल प्रायोगिक तत्त्वावर
हिंजवडी परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, वाहतूक वळवण, बॅरिकेड्स बसवणे, आणि चौक सुधारणा यांसारखे बदल एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येणार आहेत.