निवडणुकीसाठी सांगली पोलिस सज्ज (फोटो- सोशल मीडिया)
सांगली जिल्ह्यात सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
सांगलीत १५०० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सांगली शहरात आदर्श आचारसंहिता अबाधित ठेवण्यासाठी सुमारे १५०० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी १६० गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहेत, तसेच सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे पत्रकार परिषदेत यांनी दिली.
सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस प्रमुख घुगे यांनी सांगितले, ज्यामध्ये ७०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, १४ पोलीस उपनिरीक्षक, ७० सहायक पोलीस उपनिरीक्षक, १११० अंमलदार असा बंदोबस्त असणार आहे.
महाराष्ट्रात गावागावांत फुलले कमळ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांचेच
या उपाययोजना
पोलीस प्रशासनाकडून कोंबिंग ऑपरेशन करून संशयित गुन्हेगार, वस्तू, हत्यारे जप्त केली जाणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. स्ट्रॉंगरूम सुरक्षेची काळजी घेण्यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली राबवली जाणार आहे.
आदर्श आचारसंहितेसाठी बैठक
आदर्श निवडणूक आचारसंहिता राबवता यावी, निघणाऱ्या प्रचार रॅली, सभा यामध्ये कोणते निर्बंध आहेत, कोणत्या संहिता आहेत, पोलीस प्रशासनाला काय अपेक्षा आहेत, याबाबत आम्ही राजकीय प्रमुखांसोबत बैठक घेणार असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
निकालांनी महाविकास आघाडीला धसका, कसा ठरला निकाल?
चुकीची पोस्टरबाजी करणाऱ्यांवर गुन्हा
पोलीस अधिक्षक म्हणाले, शहरात काही पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचे दिसत आहे. यामध्ये काही राजकीय उल्लेख असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पोस्टर कोण लावली याबाबत पोलीस माहिती घेत असून अफवा त्यांची नावे निष्पन्न झाल्यावर अफवा पसरविल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
निकालांनी महाविकास आघाडीला धसका, कसा ठरला निकाल?
निकालांनी महाविकास आघाडीला धसका
रविवारी निवडणुकीची मतमोजणी सहसा होत नाही. यावेळी ती झाली. याचे कारण आधीच निकाल लांचाले होते त्यात आणखी उशीर नको होता. २ डिसेंबरला मतदान होऊन गेलेल्या दोनशेहून अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींमधील राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि उमेदवार सारेच निकाल लागत नाही म्हणून हैराण होते. त्याच वेळी, डझनावारी शहरांमध्ये मतदान बाकी असताना, इतर शहरांतील निकाल आधीच लागू नयेत अशी भावना न्यायालयाने व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाने उर्वरीत शहरांतील मतदान शनिवारी घेतले आणि लगेच रविवारी सर्वत्र मत मोजणी करून घेतली हे बरेच झाले.






