नागपुर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरव झेंडा

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा लोकापर्ण केल्यानंतर त्यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

    नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर असून, आज सकाळच्या सुमारात ते नागपुरात दाखल झाले. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा लोकापर्ण केल्यानंतर त्यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थित होते.

    वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीडम पार्कमध्ये पोहोचले. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना हात हलवून अभिवादन केले, यावेळी लोकांनी जय श्री रामचा नाराही दिला. त्यानंतर त्यांनी फ्रीडम पार्क ते खापरी अशी नागपूर मेट्रोमधून प्रवासही केला. त्यांनी मेट्रोचे तिकीट काढल्यानंतर, नंतर नागपूर मेट्रोच्या कामाचीही चौकशी केली.  यावेळी मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

    नागपूर दौऱ्यात मोदी एकूण 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत.नुकतच त्यांनी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या ‘समृद्धी महामार्ग’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही केलं. नागपुरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ (NIO) आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही मोदी करणार आहेत.