मुंबई : मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या मुंबईत येत आहेत (Mumbai Visit). हा पूर्णपणे राजकीय दौरा असून मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
तर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीपासूनच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या जय्यत तयारीला लागले आहेत. यातच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्या शेजारीच म्हणजेच बीकेसी ग्राउंडवर (BKC Ground) घेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
[read_also content=”पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पती झाला राक्षस, रुमला घातलं कुलूप, अशी केलीये हृदयद्रावकपणे हत्या https://www.navarashtra.com/crime/chhattisgarh-crime-balod-husband-death-wife-brutally-due-to-doubt-on-his-character-nrvb-362823.html”]
[read_also content=”मोठी बातमी! महिलेची छेड काढणारे औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन; पीडित महिलेच्या पतीलाही केली होती मारहाण https://www.navarashtra.com/crime/big-news-aurangabad-crime-acp-vishal-dhume-finally-suspended-for-molesting-woman-victims-husband-was-also-beaten-nrvb-362782.html”]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जय्यत तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमी फोरम येथील दौराही आटोपता घ्यायचा ठरवला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दौराच रद्द केला. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर राज्यातील गुंतवणुकीच्या संधी वाढणार आहेत.