Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून सीआयडी पथक बीडमध्ये ठाण मांडून बसले असून, रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे.
30 Dec 2024 09:42 PM (IST)
भारतात गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणावरून बऱ्याच चर्चा रंगत असतात. यामध्ये वर्क लाइफ बॅलेन्स हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. उद्योगपती गौतम अदाणी यांनीही काम आणि खासगी आयुष्य यामधील समतोल साधण्याबद्दल ठाम मत मांडलं आहे. ‘माझं वर्क-लाइफ बॅलेन्स तुमच्यावर लादलं जाऊ नये. तुम्ही फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की, मी माझ्या कुटुंबासोबत चार तास घालवत आहे आणि मला त्यामधून आनंद मिळत आहे. कोणीतरी आठ तास घालवत आहे, जर आठ तास घालवत असेल तर बायको पळून जाईल”, असं मत त्यांनी मांडलं आहे.
30 Dec 2024 08:33 PM (IST)
गेल्या महिन्याभरात अल्पवयीन मुलीवर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दररोज नवे नाव, महिला-मुलींना छळण्याचा नवा प्रकार. जनक्षोभ, मोर्चे, निदर्शने, मुलींच्या पालकांना, कुटुंबांना पडलेला एकच प्रश्न, हे थांबणार कधी? अशातच आता उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद परिसरात नात्याला काळिमा फारसणारी घटना समोर आली. येथे चुलत भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या अत्याचारनंतर या अल्पवयीन मुलींने रुग्णालयात बाळाला जन्म देखील दिल्याचे समजत आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
30 Dec 2024 07:51 PM (IST)
गुगलची लोकप्रिय ईमेल सेवा Gmail आपल्याला क्षणोक्षणी फायद्याची ठरत आहे. ऑफीस असो किंवा कॉलेज आपल्याला आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट मेल करण्यासाठी सांगितंल जातं. Gmail हा एक अधिकृत मार्ग मानला जातो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा तुमचा मॅसेज शेअर करू शकता. जगभरातील करोडो लोकं Gmail चा वापर करतात. तुम्हाला समजत नसेल की मेलला काय उत्तर द्यावं, तर अशावेळी तुम्हाला Gmail मध्ये असलेली एआय मदत करणार आहे. यासोबतच Gmail मध्ये आणखी एक फीचर आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहितीच नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही Gmail शेड्युल करू शकता.
30 Dec 2024 07:05 PM (IST)
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पंचायतीत सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न 7 जानेवारीपूर्वी सोडवावे लागतील. याशिवाय तुरुंगात असलेल्या शेतकऱ्यांची नववर्षापूर्वी सुटका करावी, अशी मागणी महापंचायतीत करण्यात आली.
30 Dec 2024 06:00 PM (IST)
लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी सीएम आतिशी यांना पत्र लिहिले आहे. अलीकडच्या काही दिवसांत, एलजीने आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणण्यावर आक्षेप व्यक्त केला. मला हे अतिशय आक्षेपार्ह वाटले आणि त्यामुळे मी दुखावलो, असे एलजीने लिहिले आहे.
30 Dec 2024 05:00 PM (IST)
यूपीमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने संघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर उत्तर प्रदेशातील जिल्हानिहाय बोर्ड अध्यक्षांच्या नव्या पदांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात 1819 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. त्यापैकी 750 जणांची यादी जाहीर झाली असून, उर्वरित मंडल अध्यक्षांची यादीही भाजप लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
30 Dec 2024 04:23 PM (IST)
पंजाबमधील शेतकऱ्यांनी दुपारी ४ वाजता राज्य आणि राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे ट्रॅक रिकामे केले. शेतकऱ्यांनी आपला पंजाब बंद यशस्वी झाल्याचे वर्णन केले आहे. आपल्या अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज पंजाब बंद पुकारला होता.
30 Dec 2024 03:01 PM (IST)
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले की, दिल्ली सरकार आणि मला वैयक्तिकरित्या DTC आणि क्लस्टर बस चालक महिलांना पाहून बस थांबवत नाहीत आणि पुढे जातात अशा तक्रारी येत होत्या. महिलांना अधिकाधिक महिलांनी प्रवास करावा असे आश्वासन देऊ इच्छितो. दिल्ली सरकार यासाठी कटिबद्ध आहे. महिला कामावर जातील, मुली शाळा-कॉलेजात जातील. महिला काम करतात तेव्हा अर्थव्यवस्था विकसित होते. आम्हाला दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने एक आदेश जारी केला आहे आणि सूचना दिल्या आहेत की जर कोणी ड्रायव्हर किंवा कंडक्टर महिलांना पाहून बस थांबवत नसेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. बस चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात येणार आहे.
30 Dec 2024 02:39 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते एक महान दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान चिरस्थायी वारसा सोडले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अमेरिकेतील लोकांप्रती माझ्या संवेदना.
30 Dec 2024 02:03 PM (IST)
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची ICC कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.
30 Dec 2024 01:32 PM (IST)
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तब्बल दीड हजार पोलीस रस्त्यावर उतरले आहे. पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहिमेला सुरुवात करण्यात आली. शहरात पर्यटकांची वाढलेली गर्दी, चेन स्नॅचींगच्या घटना आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आहे.
30 Dec 2024 01:00 PM (IST)
निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली असून मंदिरातल्या पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये मानधन मिळणार आहेत.
30 Dec 2024 12:43 PM (IST)
जर्नल ऑफ मेडिकल एव्हिडन्समध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की 25 ते 49 वयोगटातील 4.8% भारतीय महिलांना हिस्टेरेक्टॉमी झाली आहे, ज्यात कृषी कामगारांमध्ये सर्वाधिक प्रमाण 6.8% आहे असे दिसून आल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
भारतात 25-49 वर्षीय महिलांमध्ये 4.8% सरासरीने काढले गेले गर्भाशय, अभ्यासात धक्कादायक खुलासा
30 Dec 2024 12:41 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना संपला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या संघाला १८४ धावांनी पराभूत केलं आहे आणि या मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
टीम इंडियाने सामना गमावला! ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी केलं पराभूत, वाचा संपूर्ण अहवाल
30 Dec 2024 12:39 PM (IST)
तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेकडून रेल्वे वेळापत्रकात बदल करणार आहे. भारतीय रेल्वे 1 जानेवारी 2025 रोजी गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. सध्याचे वेळापत्रक, ‘ट्रेन ॲट अ ग्लान्स’ ची ४४ वी आवृत्ती ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे. गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने ऑल इंडिया रेल्वे टाइम टेबल – ट्रेन्स ॲट अ ग्लान्स (TAG) जारी केले होते, जे 1 ऑक्टोबरपासून लागू होते.
30 Dec 2024 11:25 AM (IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी रविवारी रात्री उशिरा जॉर्जिया येथील त्यांच्या घरी निधन झाले. 1 ऑक्टोबर 1924 रोजी जन्मलेले कार्टर हे 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ जगणारे अध्यक्ष होते.
कार्टर हे काही काळापासून मेलेनोमाने त्रस्त होते. हा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. तो त्याच्या यकृत आणि मेंदूमध्ये पसरला होता. 2023 मध्ये, त्यांनी हॉस्पीस काळजी घेण्याचे ठरवले. हॉस्पीस केअरमध्ये, रुग्णालयात उपचार नाकारले जातात. मग काही नर्सिंग स्टाफ आणि कुटुंबातील सदस्य घरीच रुग्णाची काळजी घेतात.
30 Dec 2024 10:52 AM (IST)
ठाणे महापालिकेचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ठाणे शहराच्या विकासासाठी आणि शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
30 Dec 2024 10:22 AM (IST)
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे. “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.”
इथे क्लिक करा: Prajakta Mali News: ‘त्या’ सर्वांवर कारवाई होणार…; प्राजक्ता माळीच्या भेटीनंतर फडणवीसांचे आश्वासन
30 Dec 2024 09:24 AM (IST)
रोहित शर्मा विरुद्ध पॅट कमिन्स : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एमसीजी कसोटीचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती, मात्र पॅट कमिन्सने एका षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले.
इथे क्लिक करा: IND vs AUS : रोहित विरुद्ध कमिन्स, ऑस्ट्रेलियन कॅप्टनने 6 व्यांदा बाद करून केला विश्वविक्रम
30 Dec 2024 09:21 AM (IST)
शिवेसना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला रविवारी रात्री अपघात झाल्याची घटना घडली. जोगेश्वरीच्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातावेळी खासदार रवींद्र वायकर हेदेखील कारमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पण, गाडीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, या अपघातानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे.
इथे क्लिक करा : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान तर वायकर…