पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती (फोटो सौजन्य: Google Gemini)
पुणे : शहरात १५ मेपासून सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांमध्ये अपेक्षित शैक्षणिक निकषांचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आठवी-नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचाही समावेश केल्याची बाब उघड झाली आहे. यावर पर्यवेक्षकांचे किमान १२ वीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे. असे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आम्ही कळवल्याचे जनगणना नोडल अधिकारी विजय लांडगे यांनी सांगितले.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जनगणना कार्यक्रमानुसार महापालिका क्षेत्रात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. उपायुक्त विजय लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलन करणार आहेत. प्रत्येक पर्यवेक्षकाकडे सुमारे २०० कुटुंबे किंवा अंदाजे ८०० नागरिकांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेसाठी महापालिका प्रशासन, महापालिकेच्या शाळा, अनुदानित खाजगी शाळा तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जनगणनेसाठी विशेष मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे.
दरम्यान, काही क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्यांवर आधारित नियुक्त्या केल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलनात त्रुटी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अॅण्ड यूज’ शौचालये
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर ‘पे अॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: वादळ येत आहे, पण भारत सज्ज! मोदींनी UAEमध्ये गाडलं ‘ऊर्जा संकटाचं’ भूत, भारत होईल चिंतामुक्त; पाहा नेमकं काय घडलं?






