सौजन्य - नवराष्ट्र टीम
एक नोट, एक वोट
पवार म्हणाले की, आमदाराचा पोरगा पैसा वाटून मत मागतो, सुसायटीच्या चेअरमनचा मुलगा पैसा वाटून नगरसेवक होणार, मग आमच्यासारख्या गरीब लोकांनी कधी नगरसेवक व्हायचं, म्हणून मी आता एक नोट विकासासाठी, आणि एक वोट जनतेसाठी मागत आहे. महापालिका निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी ठामपणे असेल, असा विश्वास आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण तयारी झाली आहे. पुण्यातील 60 जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडून येतील असा मला विश्वास आहेत. पुण्यातील धनकवडीसह इतर भागातही आमच्या कार्यकर्त्यांचे चांगलं काम सुरू आहे. नागरिकांची भाजपवर नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमचे अनेक नगरसेवक निवडून येतील, असाही विश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला.






