• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rashtriya Samaj Party And Congress Will Contest The Upcoming Elections Together

ठरलं! राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस निवडणुका एकत्र लढणार; पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा

महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 24, 2025 | 05:09 PM
ठरलं! राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस निवडणुका एकत्र लढणार; पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून, नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.

टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आज आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.

महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्यामुळे पुण्यात आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील. भाजपवर पुण्यातील नागरिकांची नाराजी आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी रासपची पूर्ण तयारी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. जानकर साहेबांच्या निर्णयामुळे पुणे महापालिका निवडणुकीत रासपचे अनेक नगरसेवक निवडून येतील. – बालाजी पवार, (रासप, पुणे)

Web Title: Rashtriya samaj party and congress will contest the upcoming elections together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Election News
  • Harshvardhan Sapkal
  • Mahadev Jankar

संबंधित बातम्या

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी
1

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
2

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत
3

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत

एक नोट द्या, एक वोट द्या; पुण्यात ‘रासप’च्या इच्छुक उमेदवाराचा अनोखा प्रचार
4

एक नोट द्या, एक वोट द्या; पुण्यात ‘रासप’च्या इच्छुक उमेदवाराचा अनोखा प्रचार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’

Garud Puran: संस्कारी आणि नशीबवान मुलं जन्माला घालयची आहेत का? आई-वडिलांनी आजपासूनच पाळा ‘गुप्त नियम’

Dec 24, 2025 | 06:49 PM
Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

Dec 24, 2025 | 06:48 PM
CAT 2025 चा निकाल जाहीर! लाखो MBA इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी

CAT 2025 चा निकाल जाहीर! लाखो MBA इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी

Dec 24, 2025 | 06:48 PM
December Deadline: ३१ डिसेंबरपूर्वी उरका ‘ही’ ३ महत्त्वाची कामे; अन्यथा १ जानेवारीपासून बसणार मोठा आर्थिक फटका

December Deadline: ३१ डिसेंबरपूर्वी उरका ‘ही’ ३ महत्त्वाची कामे; अन्यथा १ जानेवारीपासून बसणार मोठा आर्थिक फटका

Dec 24, 2025 | 06:42 PM
Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs

Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs

Dec 24, 2025 | 06:40 PM
”तिला फक्त त्याचा पैसा हवा…”, गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली…

”तिला फक्त त्याचा पैसा हवा…”, गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली…

Dec 24, 2025 | 06:34 PM
रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

Dec 24, 2025 | 06:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM
Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:46 PM
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.