केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला सहकाराच्या माध्यमातून म्हणजे देशाच्या विकासाला जाेडले पाहीजे. यासाठी सहकार क्षेत्रासाठी केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत ‘अंब्रेला’ ही शिखर संघटना स्थापन केली असून, दाेन वर्षांत सहकारी बॅंकाचे देशपातळीवर ‘क्लिअरींग हाऊस’ तयार हाेईल, अशी माहीती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली.
जनता सहकारी बॅंकेच्या अमृत महाेत्सवाचा सांगता समारंभ शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेठकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित हाेते. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी बॅंकेच्या वतीने ‘अंब्रेला’ या संस्थेसाठी प्रभातकुमार चतुर्वेदी यांच्याकडे पाच काेटी रुपयांचा धनादेशही साेपविण्यात आला.
शहा म्हणाले, ‘‘संचालक मंडळ, सदस्य हे एका हेतूने काम करीत असतील तर काेणतीही संस्था ७५ वर्ष सातत्याने चांगल्या पद्धतीने चालते हे जनता सहकारी बॅंकेच्या वाटचालीतून दिसुन येते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसित देश आणि देशाची आर्थिक व्यवस्था पाच ट्रिलियन पर्यंत पाेचविण्याचा निर्धार केला आहे . सहकाराचा विकास झाल्याशिवाय हे शक्य नाही.
शिवसेना अन् राष्ट्रवादीबद्दल अमित शहांचं मोठं विधान, म्हणाले…
आपला देश विकसित झाला, पण प्रत्येक व्यक्तीला काम दिले नाही तर ते व्यर्थ ठरेल. प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबाला विकासाशी जाेडण्यासाठी सहकार हा महत्वाचा भाग आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने हे मंत्रालय सुरु केले.’’ देशातील ७० काेटी गरीबांसाठी घर,वीज, पाणी, शाैचालय, गॅस, आरोग्य , विमा , माेफत धान्य अशा याेजना राबिवल्या आहेत, आता या प्रत्येक व्यक्तीचा देशाच्या विकासात आता याेगदान हवे आहे. त्यासाठी सहकारच महत्वाचा मार्ग असल्याचे केंद्रीय मंत्री शहा यांनी स्पष्ट केले.
सहकाराच्यामाध्यमातून विकासाला दिशा देण्याचे काम
सहकार चळवळीला ताकद देण्यासाठी केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतल्याचे नमूद करताना केंद्रीय मंत्री शहा म्हणाले, ‘‘ सहकारी चळवळीला मार्केटेबल करायचे आहे. सहकाराचे शिक्षण देण्यासाठी विश्वविद्यालय केली जाणार आहे. सहकाराच्यामाध्यमातून विकासाला दिशा देण्याचे काम सुरु आहे. देशांत १४६५ नागरी सहकारी बॅंका असुन, त्यापैकी ४६० बॅंका या महाराष्ट्रात आहे, शेड्युल्ड बॅंका ५९ आहेत. हे लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी मागणी केली हाेती.
त्यानुसार पुण्यात ‘सीअारसीएस’चे कार्यालय हाेणार आहे. यामुळे सहकारी बॅंकाच्या अडचणी दुर हाेण्यास मदत मिळेल. शेड्युल्ड बॅंॅकांना यातून ताकद मिळेल. सहकारी बॅंकंाच्या ‘अंब्रेला’ या संघटनेसाठी तीनशे काेटी रुपयांची निधी जमा केला आहे. या निधीचा उपयाेग अाता सहकारी बॅंकाच्या विकासाकरीता केला जाईल. बॅंकेच्या तांत्रिक अडचणी, काेअर बॅंकीग आदीसाठी हा निधी दिला जाईल. नागरी सहकारी बॅंक, जिल्हा सहकारी बॅंक, राज्य सहकारी बॅंकेचा क्लिअरींग हाऊस पुढील दाेन वर्षांत तयार केले जाईल.’’