पुण्यात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले (फोटो- istockphoto)
पुणे: पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हीट अँड रन, कोयता गॅंग, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुणे पोलीस गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. कडक कारवाई देखील करत आहेत. मात्र अशा गुन्ह्यासोबतच आता सायबर क्राईमचे गुन्हे देखील वाढताना दिसत आहेत. पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूकीचे सत्र सुरू असून, दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पद्मावती भागातील ३६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीचे आमिष दाखविले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,असे सांगितले. चांगला परतावा मिळेल या आमिषाने महिलेने चोरट्यांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी २६ लाख २५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला, असे भासविले. महिलेने परताव्याबाबत विचारण केली. तेव्हा चोरट्यांनी मोबाईल बंद केले. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
पार्सल पकडल्याची भिती दाखवून २० लाखांना गंडा
विमाननगरमधील महिलेची सायबर चोरट्यांनी पोलीस कारवाईची भीती दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोदंवला आहे. तक्रारदार महिलेला संपर्क साधत मुंबई विमानतळावरुन दक्षिण कोरियात कुरिअरव्दारे एक पाकिट पाठविले आहे. या पाकिटावर तुमचे नाव आहे. त्यात दोन पारपत्र, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.
हेही वाचा: घरी बसून पैसे कमावणे महिलेला पडलं महागात; 31 लाखांचा घातला ऑनलाईन गंडा
क्रेडीड कार्डच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून १ लाख ३१ हजार रूपये ऑनलाईन उकळले. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीत राहणाऱ्या ७९ वर्षीय ज्येष्ठाने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे.
ऑनलाइन पैसे कमावणे पडले महागात
बाईलवर घरी बसून ऑनलॉईन पैसे कमवा, या आशयाचा व्हिडिओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला महागात पडले. या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित शिक्षिकेला तब्बल 31 लाख 15 हजार 220 रुपयांचा ऑनलाईन चुना लागल्याने, परीसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 24) उघडीस आली. पीडित शिक्षिकेने याची तक्रार बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे दाखल केलेली आहे.