पुण्यात पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर टीका (फोटो- ani)
पुणे/Aditya Thackeray Vs Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला. शिवसेना फुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आज शिवसेनेने पुण्यात पोस्टरबाजी करत आमदार आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. पुण्यात शिवसेनेने लावलेले हे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यावर हे पोस्टर लावण्यात आले आहे.
पुण्यात शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये मिठी नदीच्या घोटाळ्याचा संदर्भ देण्यात आला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंचे कार्टून दाखवण्यात आले आहे.’ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते.
#WATCH | Maharashtra: Hoardings by Eknath Shinde-led Shiv Sena, targetting Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray seen in Pune days after his remarks on Deputy CM Eknath Shinde over the split in party. pic.twitter.com/y5S6NkG3lR
— ANI (@ANI) July 19, 2025
शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार
आदित्य ठाकरेंचे कार्टून असलेले पोस्टर हे पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या पोस्टरमध्ये मिठी नदीच्या घोटाळ्याचा संदर्भ देण्यात आला आहे. हे पोस्टर शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी लावले आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना हे उत्तर असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले आहे. या अधिवेशनात बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता गद्दार आणि निर्लज्ज असे शब्द वापरले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेत्याचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपातीपणाचा आरोप लावला होता. विधानसभेत घडलेल्या घटनेचे पडसाद आता पोस्टरबाजीच्या माध्यमातून रस्त्यावर सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
शिलेदारांचे कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदार आणि खासदार त्यांच्या वादग्रस्त कृतींमुळ अडचणीत आले आहेत. दिवसेंदिवस शिंदेसेनेतील नेत्यांची एक-एक प्रकरणे उघडकीस येतआहेत. त्यामुळे दिवसागणिक नव्या पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
शिंदेसेनेत सुरू असलेल्या या मालिकांमुळे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीत धाव घेतली.शिंदेसेनेतील काही शिलेदारांची वादग्रस्त प्रकरणे गेल्या काही दिवसांत सार्वजनिक झाल्याने केंद्रीय नेतृत्त्व नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. त्यात व्हिडिओ व्हायरल होणं, पैशांच्या बॅगांची चर्चा, स्थानिक पातळीवर प्रशासनाशी वाढलेला संघर्ष, तसेच अनेक मंत्र्यांच्या आक्रमक आणि असमंजस विधानांनी पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.