• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Farmers Have Suffered Losses Due To The Burning Of Sugarcane In The Kadamwakvasti Area

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2025 | 01:38 PM
कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अडीच एकर ऊस जळून खाक
  • शेतकऱ्याचं मोठं नुकसान
  • कदमवाकवस्ती परिसरातील घटना
कदमवाकवस्ती : लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथे सहा शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळून खाक होऊन दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असतानाच बुधवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरात अडीच एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

या आगीत संपत महादेव गुजर या शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ते सुरतपट्टीलगत शेती करणारे शेतकरी आहेत. गुजर यांनी अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांतच ऊस तोडणीला येणार असल्याने हाच ऊस त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. मात्र, एका क्षणात संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने गुजर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुजर यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने संपूर्ण शेत व्यापले. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि तातडीने घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाणे व अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत हे घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत अडीच एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता.

शासनाने नुकसानभरपाई द्यावी

ऊसाला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऊस जळीत झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात असून, दोषींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या घटनेचा त्वरित पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच ऊस जळीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संपत गुजर यांनी केली आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशा घटना म्हणजे आर्थिकदृष्ट्या कंबर मोडणाऱ्या ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण

लोणी काळभोर–कदमवाकवस्ती परिसरात वारंवार घडणाऱ्या ऊस जळीत घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे अवघड होईल, असा इशारा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Farmers have suffered losses due to the burning of sugarcane in the kadamwakvasti area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार
1

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
2

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

आंदेकर कुटुंबातील सदस्याला निवडणूकीत तिकिट देऊ नका; आयुष कोमकरच्या आईचे भावनिक आवाहन
3

आंदेकर कुटुंबातील सदस्याला निवडणूकीत तिकिट देऊ नका; आयुष कोमकरच्या आईचे भावनिक आवाहन

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
4

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग

Dec 26, 2025 | 04:02 PM
शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात व्यापक सुधारणा! शालेय शिक्षण विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात व्यापक सुधारणा! शालेय शिक्षण विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम

Dec 26, 2025 | 03:52 PM
Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु

Salman Khan च्या ६० वा वाढदिवसाचा जल्लोष; भाईजान बनला पेंटर, जाणून घ्या पार्टी कुठे आणि कधी होणार सुरु

Dec 26, 2025 | 03:49 PM
Palladian Partner Real Estate: पॅलाडियन पार्टनर्सची 2025 मध्ये दमदार कामगिरी! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा केला व्यवहार

Palladian Partner Real Estate: पॅलाडियन पार्टनर्सची 2025 मध्ये दमदार कामगिरी! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा केला व्यवहार

Dec 26, 2025 | 03:48 PM
New Year Party: “खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न…”; मंत्री झिरवाळांचे प्रशासनाला स्पष्ट निर्दश

New Year Party: “खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न…”; मंत्री झिरवाळांचे प्रशासनाला स्पष्ट निर्दश

Dec 26, 2025 | 03:47 PM
BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला; कुणाला मिळणार पहिली उमेदवारी?

Dec 26, 2025 | 03:46 PM
धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट ‘ikkis’ साठी देओल कुटुंब भावुक, सनी आणि बॉबी देओल करणार स्पेशल स्क्रिनिंग!

धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट ‘ikkis’ साठी देओल कुटुंब भावुक, सनी आणि बॉबी देओल करणार स्पेशल स्क्रिनिंग!

Dec 26, 2025 | 03:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM
अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Dec 25, 2025 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.