या पारितोषक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन दत्ता शेळके,प्रास्ताविक, मागील वर्षाचा आढावा व आर्थिक अहवाल वाचन प्रदीप वाघ यांनी केले. प्रमुख पाहुणे अनुपकुमार (ॲडिशनल जनरल मॅनेजर ॲम्युनेशन फॅक्टरी) यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष गोल्फ खेळाडू राजेंद्र नागेशकर,उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सचिव वसंत ठोंबरे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले.
२०२५–२६ वर्षाच्या स्पर्धांमध्ये टाटा मोटर्सने ३१ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद तर बजाज ऑटो आकुर्डी संघाने २७ गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले.टाटा मोटर्स कडून टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे व टाटा मोटर्सचे एचआर व स्पोर्ट्स मॅनेजर नितीन कदम यांनी तर बजाज ऑटोकडून बजाज ऑटोचे एचआर व स्पोर्ट्स मॅनेजर अतुल काळोखे यांनी अनुपकुमार, राजेंद्र नागेशकर व वसंत ठोंबरे यांच्याकडून उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला.याच प्रसंगी संस्थेचे २०२६–२७चे क्रीडा वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम
सत्काराला उत्तर देताना अनुपकुमार म्हणाले की “खेळाचा छंद माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतो व ऊर्जा वाढते;यामुळे माणसाने नित्यनियमाने खेळ खेळलाच पाहिजे. ६२ वर्षाची औद्योगिक क्रीडा संघटना कामगार क्षेत्रातील खेळाडूंना क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळवून देते याचा मला खूप आनंद होतो. तर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले की २०२५–२६ मध्ये संघटनेच्या स्पर्धांमध्ये जवळजवळ २५० कंपन्यांनी,२५०० च्यावर खेळाडूंनी १४ स्पर्धामधून आपला सहभाग नोंदवला. औद्योगिक क्रीडा संघटनेने क्रीडा क्षेत्राची अधिकाधिक व्याप्ती वाढवावी व अधिकाधिक महिला खेळाडूंना या मध्ये सहभागी करून घ्यावे.यावर्षी “महिला क्रिकेट व पासिंग व्हॉलीबॉल” या खेळाची प्रथम सुरुवात करण्यात आली ही उल्लेखनीय बाब आहे.
वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’
याप्रसंगी स्पर्धेत प्रायोजकत्व देणाऱ्या १२ कंपन्यांना(सँडविक एशिया,टाटा मोटर्स,बजाज ऑटो आकुर्डी,फॉरविया फॉरेशिया,एसकेएफ,प्राज इंडस्ट्रीज,ॲटलास कॉपको,अल्ट्रा कार्पोटेक,महेंद्रा अँड महिंद्रा,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,एमक्यूअर फार्मासिटिकल्स, जेसीबी, टेट्रापॅक, ॲम्युनेशन फॅक्टरी,टाटा टेक्नॉलॉजी,सिग्मा इलेक्ट्रिकल) नरेंद्र कदम,विजय हिंगे,हरी देशपांडे,अतुल काळोखे,गिरीश गायकवाड,दुष्यंत गायकवाड, दयानंद प्रक्षाले,सचिन कांबळे,मंदार कुलकर्णी,दत्ता पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय हिंगे,हरी देशपांडे,प्रदीप वाघ,दुष्यंत गायकवाड,संतोष शिंदे,अशोक त्यागी,दयानंद प्रक्षाले,अतुल काळोखे,सचिन कांबळे,गिरीश गायकवाड,मंदार कुलकर्णी,अनिकेत आवटे,राहुल चावरिया,कृष्णा कोले , मिनीनो कार्डोझ,वल्लभ मेंगाळे यांचे मोलाचे साह्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन वसंत ठोंबरे यांनी केले.






