बिबट्या सीसीटीव्हीमध्ये झाला कैद (फोटो- टीम नवराष्ट्र)
अवसरी खुर्द येथील बिबट्या पुन्हा आढळला
बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद
परिसरात पसरले भीतीचे वातावरण
मंचर: अवसरी खुर्द तालुका आंबेगाव (Pune) येथील कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या जवळ शनिवारी पहाटे चार वाजता पुन्हा एकदा बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अठरा दिवसात पुन्हा बिबट्या(Leopard) घरच्या जवळ आल्याने भीतीचे वातावरण आहे.
कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या पोर्च मध्ये अठरा तारखेला पहाटे तीन बिबटे आले होते. तेव्हा पासून घराशेजारी पिंजरा लावला आहे. शनिवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जुन्या घराच्या मागील बाजूने आला. जुन्या घरासमोरून पुन्हा नवीन बंगल्याच्या समोरील व-र्हांडया मधून घराशेजारील रस्त्याने पूर्वेस निघून गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. नवीन घराच्या उत्तरेस वनविभागाने पिंजरा लावून त्यात भक्ष्य म्हणून दोन कोंबड्या ठेवल्या आहेत तरी त्याकडे त्याने ढुंकून ही न पाहता निघून गेला आहे.
शुक्रवारी सायंकाळी भोरवाडी भोरमळा परिसरात बिबट्या शेतात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या अगोदर दोन दिवसापूर्वी अवसरी खुर्दच्या पूर्वेस तीन बिबटे चारचाकी गाडीस आडवे जाताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या मुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा .अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई
शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. पिंपरखेड,जांबुत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि. ३ रोजी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयात ७ नवीन पिंजरे दाखल झाले असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…
दरम्यान आज पहाटे शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनी जवळ रात्री लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. हा बिबट्या अंदाजे ४ वर्षांचा असून त्याची तात्काळ माणिकडोह निवारा केंद्राकडे रवानगी करण्यात आली.तर पिंपरखेड येथे लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाचा नर बिबट जेरबंद झाला.रावडेवाडी (कवठे येमाई जवळ) आज पहाटेच अंदाजे ४ वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली आहे.






