प्रशांत जगताप यांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश (फोटो- सोशल मीडिया)
प्रशांत जगताप यांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश
नाराज झाल्याने शरद पवारांच्या पक्षाचा राजीनामा
टिळक भवनमध्ये पार पडला प्रवेश
पुणे: राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर प्रशांत जगताप यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष यांनी युती केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि अन्य ज्येष्ठ कॉँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत जगताप यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांचा कॉँग्रेसमधला प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी आणि पक्षासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
काय म्हणाले होते प्रशांत जगताप?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार ! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल ! आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !
बातमी अपडेट होत आहे…






