कोर्टाने आरोपींचा जामिन फेटाळला (फोटो- istockphoto)
या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी चौघांनी न्यायालयात अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील निलीमा यादव-इथापे यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे परिक्षेपुर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. याखेरीज, या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ॲड. इथापे यांनी केला.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. दिपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा,सोनाली ता. वराठी, जि.भंडारा) याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एम.पी.एस.सीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.
Crime News Pune: MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी; तिघांना अटक
रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती.