काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?
Mutha River Revitalization Project: पुणे महानगरपालिकेने पुणेकरांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुठा नदीकाठी पुराच्या समस्येला तोंड देणाऱ्या एकता नगर, विठ्ठलनगर आणि निंबाजनगर येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुणे महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पूर्व-गणना समितीच्या बैठकीत या नदी पुनरूज्जीवन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. या पाण्यामुळे अनेकदा या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. विशेषतः सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पण या नदी पुनरुज्जीव प्रकल्पामुळे या परिसरातील नागरिकांना पुराच्या समस्येतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. महानगरपालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पात मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नद्यांचा ४४ किमी लांबीचा भाग समाविष्ट आहे, हा प्रकल्प ११ टप्प्यात विभागण्यात आला आहे. संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी, पुढील चार दिवस…
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत स्ट्रेच-६ (वडगाव खुर्द ते राजाराम पूल) वर खालील कामे केली जातील. दोन्ही बाजूंनी बंधारे बांधून पूर सहन करण्याची क्षमता वाढवणे, नागरिकांसाठी मार्ग आणि घाट विकसित करणे आणि नदीकाठचे सुशोभीकरण करणे हा यामागील उद्देश आहे. महापालिकेचे म्हणणे आहे की ही कामे नदीकाठच्या वस्त्यांना पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण देतील.
या प्रकल्पाचा प्रारंभिक खर्च ३०० कोटी रुपये असण्याचा अंदाज होता. परंतु सविस्तर पूर्व-गणना पत्रक तयार केल्यानंतर, त्याची किंमत ३६९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. महापालिकेच्या मते, पुणे शहराचे दीर्घकालीन पुरासारख्या आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरेल.
Bandu Andekar News: पुणे पोलिसांची बंडू आंदेकरच्या घरावर धाड; सापडलं मोठं घबाड
बंडगार्डन ते मुंढवा हे काम वेगाने सुरू आहे. आता महानगरपालिकेने सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द ते राजाराम पूल असा ४.१ किमी लांबीचा मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ आणि २५ जुलै २०२४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे साखळी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुणे शहर, विशेषतः सिंहगड रोड परिसरातील सखल भाग, एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबाजनगर पाण्याखाली गेले.
अनेक इमारती आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे भेट दिली आणि पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतरही २०२५ मध्येही काही सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली. या सर्व घटनांनंतर महापालिकेने या प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून सरकारकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.