Trump-Epstein ची टायटॅनिक पोज; वॉशिंग्टनमधील 'त्या' पुतळ्याने जगभरात खळबळ(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्पला आवडला नाही जेफ्रीच्या “मैत्रीचा हात” ; संताप व्यक्त करताच हटवले वॉशिंग्टनमधील पुतळे
सिक्रेट हँडशेक नावाच्या एका कलाकार गटाने निषेधात्मक प्रदर्शन केले आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टनी यांचा पुतळा टायटॅनिक पोझमध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामळे अमेरिकेत नवा वाद पेटला आहे. यापूर्वी देखील या गटाने जेफ्री एपस्टीन आणि ट्रम्प यांचा हातातहात धरलेला पुतळाच असा वॉशिंग्टनच्या मध्यभागी उभा केला होता.. तसेच मादील आठवड्यात जेफ्री एपस्टीन वॉक ऑफ शेम नावाने हॉलीवूड वॉक ऑफ फेम नक्कल करणारे कार्यक्रमही भरवण्यात आला होता. यामध्ये एपस्टीनशी संबंधित राजकारणींचा आणि अब्जावधींचा समावेश होता.
या कलाकृती अशा वेळी समोर येत आहेत, जेव्हा अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन प्रकरकणाशी संबंधित नव्या मुलाखतींचे रेकॉर्ड जाहीर केले आहे. कागपत्रांनुसार, एका महिलेने ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये महिलेने दावा केला आहे की, १९८० मध्ये एपस्टीनने तिची ट्रम्पशी ओळख करुन दिली होती. यावेळी ट्रम्प यांनी तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. व्हाइट हाउसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हे सर्व आरोप निराधरा असल्याचे म्हटले आहे. सध्या न्याय विभागाने याची स्वतंत्र पडताळणी सुरु केली आहे.
सध्या अमेरिकेच्या राजकारणात यावरुन मोठा वाद पेटला आहे. डेमेक्रॅटिक पक्षाने ट्रम्प प्रशासानावर खळबळजनक आरोप केले आहे. यासाठी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सध्या अमेरिकेच्या न्याय विभागाकडे 6 लाख कागपत्रे आहेत. यातील आतापर्यंत केवळ 3 लाख समोर आली आहेत. या फाइल्सचा पुढील संच येत्या आठवड्यात खुला केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. दावा केला जात आहे की, या गायब, गहाळ झालेल्या पत्रांमध्ये ट्रम्प यांचे एपस्टीन संबंध असलेले ठोस पुरावे आहेत. एकेकाळी ट्रम्प एपस्टीनचे खास मित्र होते परंतू ट्रम्प यांनी याला वारंवार फेटाळले.
A new statue of President Trump and convicted sex offender Jeffrey Epstein has popped up again on the National Mall in Washington, D.C. Titled “The King of the World,” the monument draws inspiration from Jack and Rose in “Titanic.” pic.twitter.com/MlL6leXBCt — The Washington Post (@washingtonpost) March 10, 2026
Ans: सिक्रेट हँडशेक नावाच्या एका कलाकार गटाने निषेधात्म वॉशिंग्टन येथे एका प्रसिद्ध मॉलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीनचा एक वादग्रस्त पुतळा उभारला आहे.
Ans: न्याय विभागाने एपस्टीन संबंधित खुल्या केलेल्या नव्या कागदपत्रांमध्ये एका महिलेने ट्रम्प यांनी तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याचे नमूद आहे.






