जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मावळात ३७ जणांनी माघार घेतली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maval Political News : वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (दि. २७) होता. या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १४ तर पंचायत समितीसाठी २३ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण ३७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे. जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांसाठी सुरुवातीला एकूण १०४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत ७७ अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
सध्याच्या स्थितीत मावळ तालुक्यात फक्त तीन अपक्ष उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बहुतेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्येच थेट लढती होत असून, कुसगाव बुद्रुक–काले गटात मात्र चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गटाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Chitra Wagh on Anjali Bharti : बुद्धीची कीव करावी तितकी कमी…! अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायिकेवर चित्रा वाघ संतापल्या
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक असल्याने या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र काही ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मतविभाजन होण्याची शक्यता असून, त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हे देखील वाचा : Anjali bharati on Amruta Fadnavis : गायिका अंजली भारती जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
जिल्हा परिषद निवडणूक – माघार घेतलेले उमेदवार
गट क्रमांक २९ – टाकवे
पंचायत समिती निवडणूक – माघार घेतलेले उमेदवार
गट क्रमांक ६४ – काले






