सहाय्यक तलाठी आढळला मद्यधुंद अवस्थेत
सहाय्यक तलाठी आढळला मद्यधुंद अवस्थेत
आमदार राहुल आवाडे करत होते सुशोभिकरण कामाची पाहणी
तलाठ्याचे तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना
इचलकरंजी: जुना सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत झोकांड्या खातच आल्याचे निदर्शनास आले. त्याची गांभीर्याने दखल घेत आमदार आवाडे यांनी सहाय्यक तलाठ्याचे वैद्यकिय तपासणी करुन तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना वरिष्ठांना केल्या.
आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन रस्ता रुंदीकरणासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी डवरी सकाळी सकाळीच फुल्ल टाईट असल्याचे व झोकांड्या खात असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.
दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क
आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आमदार आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. डवरी यांची तत्काळ वैद्यकिय तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या. आमदार पाहणी करण्यासाठी आले असताना शासकीय कार्यालयातील जबाबदार अधिकारी चक्क मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा
गेल्या काही महिन्यापासून इचलकरंजीत जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांंकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तौसिफ रशिद मुल्ला (वय ३६ रा. गोकुळ चेंकि), अतुल चंद्रकांत पेटकर (वय २९), संकेत उमेश म्हात्रे (वय २९ दोघे रा. भोनेमाळ), केतन किरण घोरपडे (वय ३० रा. पाटील मळा) व वरुण जगदीश जगवाणी (वय २६ रा. यशवंत कॉलनी) हे पाचजण तीनपानी जुगार खेळताना मिळून आले. त्याचबरोबर जुगार अड्डा चालविणारा प्रकाश रविंद्र हुंडेकरी आणि इमारत मालक खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ४ मोबाईल, रोकड, डिव्हीआर, जुगाराचे साहित्य असा १ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली आहे.






