वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमरावती : शहरातील अप्पर वर्धा कॉलनी वसाहतीत दोन महिला गेल्या काही दिवसांपासून सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार सहकारी संस्थेच्या उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. त्याद्वारे निबंधक सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे यांच्या पथकाने अपर वर्धा वसाहतीत राहणाऱ्या अर्चना झटाले यांच्या घरी धाड टाकली.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग…; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
तिवसा येथील सहाय्यक निबंधक प्रीती धामणे यांच्या पथकाने पूजा राजपूत (रा. अप्पर वर्धा कॉलनी, मोर्शी) या दोन महिलेच्या घरी 10 जानेवारीला धाड टाकली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून हमीपत्र, 2 लाख 50 हजार रूपये उसनवारी दिल्याबाबतचा नोंद असलेला कागद, व्याजाने पैसे दिले असल्याबाबतची नोंदवही, दुसऱ्या व्यक्तीचे स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प पेपर व दस्तऐवज जप्त करण्यात आले.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोर्शी कार्यालयाचे अधिकारी फिर्यादी राजेश भुयार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोन्हीही सावकार महिलांना 27 जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. गैर अर्जदार दोन्ही महिलेने 31 जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सादर केला. त्यामध्ये दोन्ही महिलांनी अवैध सावकारी केल्याचे दिसून आले. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी मोर्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला. त्यानुसार, पोलिसांनी सावकार महिला अर्चना झटाले व पूजा राजपूत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 23,39, अन्वे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहे.
पुण्यातही छापेमारीची कारवाई
कोरेगाव पार्कातील नागरिकांशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या; कोयत्याने चेहरा, गळ्यावरही केले वार