• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Discovery Of Yantraraj At Raigad Fort Evidence Of Durgarajas Science Based Construction

Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा

'यंत्रराज' हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे खगोलशास्त्रीय उपकरण आहे, ज्याचा उपयोग ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी केला जात असे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 02, 2025 | 09:45 AM
Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Raigadh News: रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यात एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण—‘यंत्रराज’ किंवा सौम्ययंत्र (Astrolabe)—सापडले आहे. या शोधाची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली असून, त्यांनी या यंत्राचा फोटोही शेअर केला आहे. संभाजीराजे म्हणाले की, दुर्गराज रायगडाचे बांधकाम अत्याधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले होते, याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

‘यंत्रराज’ हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे खगोलशास्त्रीय उपकरण आहे, ज्याचा उपयोग ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी केला जात असे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त व विषुववृत्त यांचा अभ्यास सोपा करण्यासाठीही या यंत्राचा वापर होत असे. रायगड किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी खगोलशास्त्रीय मोजमापे करण्यासाठी या यंत्राचा उपयोग करण्यात आला असण्याची शक्यता आहे. या शोधामुळे रायगडाच्या विज्ञानाधिष्ठित रचनेचा नवीन पैलू उजेडात आला आहे.

PBKS vs MI : श्रेयस अय्यरसमोर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची एक चालली नाही! 87 धावांची धुव्वादार खेळी

काय म्हटलं आहे छत्रपती संभाजीराजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये?

“खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे ‘Astrolabe’. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

Weekly Horoscope: जून महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की, रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास १० ते १२ ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता, त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र (Astrolabe) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.”

Web Title: Discovery of yantraraj at raigad fort evidence of durgarajas science based construction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
1

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
2

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
3

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?
4

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

LIVE
Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.